नागपूर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ११,८९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस स्टेशन वेलतूर येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन केळवद येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन सावनेर येथे एकुण ०४ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन काटोल येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन जलालखेडा येथे एकुण ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन बोरी येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन मौदा येथे ०१ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ११ गुन्हे नोंद केले आहे.
सदर कारवाईत १०९२० मिली देशी दारु, ७२ लीटर मोहाफुल दारू असा एकुण ११,८९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.




