spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुंबई बुक फेस्टिव्हलच्या ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग

– कळसूत्री बाहुल्या, लोकनृत्य आणि लेखकांशी संवादातून विद्यार्थ्यांना साहित्यविश्वाची ओळख

मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ मधील ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन विविध सत्रांमध्ये सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी येथे साहित्य, कला आणि संस्कृतीशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांची माहिती एनसीएलएलचे संपादक दीप सैकिया यांनी दिली.

पहिल्या सत्रात ‘कळसूत्री बाहुल्यांसह गाष्टी सांगणे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सोनिया केतकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी या सत्रात सहभाग घेतला.

दुसऱ्या सत्रात ‘मराठी लोकनृत्य’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सेंट चार्ल्स हायस्कूल, वाकोला, सांताक्रूझ येथील २६ विद्यार्थी आणि एमपीएस सीबीएसई, नटवर पारेख कंपाउंड, म्हाडा कॉलनी येथील ९ विद्यार्थी सहभागी झाले. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात मिळून एकूण ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

तिसऱ्या सत्रात ‘लेखकांशी भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माधवी घारपुरे आणि शुभदा चुकार यांनी या सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इयत्ता नववी ते बारावीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी या सत्रात सहभाग घेतला. अशा प्रकारे ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मधील तीन सत्रांमध्ये एकूण १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Popular Articles