spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गजानन खापरे यांची भाजप बुनकर प्रकोष्ठ नागपूर-विदर्भ संयोजकपदी नियुक्ती

– पक्षाची जबाबदारी निष्ठेने पार पाडणार; कार्यकर्त्यांकडून स्वागत व सत्कार

नागपूर :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान यांच्या निर्देशानुसार, बुनकर प्रकोष्ठ प्रभारी मनोज दिवटे यांनी गजानन खापरे यांच्यावर बुनकर प्रकोष्ठाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवित त्यांची नागपूर – विदर्भ संयोजकपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल गजानन खापरे यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मध्य नागपुरातील आमदार प्रवीण दटके, अध्यक्ष श्याम चांदेकर, नगरसेवक तुषार लारोकर आणि प्रभाग चे नगरसेवक हेमंत बरडे, किशोर उमरेडकर वार्ड अध्यक्ष, मनीष नंदनवार आणि सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी गजानन खापरे यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Popular Articles