नागपूर :- सावरकर नगर येथील प्राथमिक शाळेत 22 नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सावरकर नगर प्राथमिक शाळेत झालेल्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी मिलिंद निमदेव होते. सर्व प्रथम सचिव हेमंत पडळकर यांचे प्रास्ताविक भाषण झाले. त्यानंतर अजेंड्या नुसार काम सुरू झाले. मागील वर्षीचे मिनीट,अकाऊंट अणि पुढील वर्षीचे बजेट सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर अध्यक्ष मिलिंद निमदेव यांचे भाषण झाले.आपल्या सविस्तर भाषणात निमदेव यांनी ब्राह्मण सेवा मंडळ या आपल्या संस्थेच्या गतीविधींची माहिती दिली. बीएसएम मुख्यत्वेकरून गरजू ब्राह्मण यांना मदत करणे या प्रमुख उद्दिष्टाने सुरू करण्यात आली आहे. त्या उद्दिष्ट पूर्ती करिता सर्व कार्यकर्ते झटून काम करतात. रुग्ण साहित्य केंद्र, औषध वाटप, जुने कपडे, अन्नदान असे बरेच उपक्रम bsm मार्फत राबविले जातात. संस्थेच्या भविष्यातील उद्दिष्टांचा पण निमदेव यांनी उहापोह केला. लवकरच bsm वृद्धांसाठी आनंदाश्रम सुरू करणार आहे. त्यानंतर धनंजय जोशी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची pharmacists असोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगळ्यानी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर, प्रमुख पाहुणे, DR.P.K.DESHPANDE, HEART SPECIALIST यांनी अतिशय उपयुक्त भाषण केले. डाॅ. देशपांडे यांनी आपल्या उद्बोधन पर भाषणात हृदय विकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या विषयावरील सगळ्यांचे शंका समाधान केले. कोषाध्यक्ष आनंद बडे यांच्या आभार प्रदर्शनात त्यांनी सर्व मेंबर्स अणि डॉ पी के देशपांडे यांचे विशेष आभार मानले. संचालन सौ. श्वेता गर्गे यांनी केले. बैठकीला नवीन उपाध्यक्ष प्रणिता देशमुख आणि नवीन सह कोषाध्यक्ष श्रीपाद चोरघडे यांनी आपला कार्यभार स्वीकारला. अन्य कार्यकारी मंडळ सदस्य रविन्द्र जोशी, दिलीप चंद्रायन, प्रतिमा टेमुर्निकर,राधिका बाकरे, दिनेश टेकाडे, किरण पथे, शेखर गावपांडे, अभय राजंदेकर या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहेनत घेतली. सरते शेवटी सगळे मेंबर्स रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन तृप्त होऊन घरी गेले.
Latest News
Related Posts
ब्राह्मण सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न






