कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल भरायला जात असलेल्या दुचाकीचालकाचा पायदळ चालणाऱ्या 17 वर्षीय बालकाला कट लागल्याने दुचाकीचालक खाली पडला दरम्यान दोघात झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला गेल्याने विधिसंघरशीत बालकाने दुचाकीचालकाला अश्लील शिवीगाळ देऊन दुचाकी चालकाच्या कमरेवर चाकूने वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना काल दुपारी अडीच वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी जख्मि 17 वर्षीय अल्पवयीन बालकाने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी 17 वर्षोय विधी संघरशित बालका विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1),352 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे




