spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

182 किलो गोमास जप्त

कामठी :- आगामी बकरी ईद च्या पाश्वरभूमीवर गोहत्या प्रतिबंध कायद्यांन्वये सतर्कता बाळगण्याच्या माध्यमातून नवीन कामठी पोलिसानी पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस स्टेशन हद्दीत धाडसत्र राबविणे सुरू केले त्यानुसार शेख बूनकर कॉलोनी येथील रशीद कमाल मोहम्मद ताहीर यांच्या दुकानात गोवंश जनावरांचे मास विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी सकाळी साडे अकरा दरम्यान धाड घातली असता दुकानात 29 हजार 928 रुपये किमतीचा 182 किलो 740 ग्राम गोमांस जप्त करण्यात आला.°तसेच एक वजनकाटा,1 किलो चे वजनमाप, ओपो कंपनीचा मोबाईल,मास करण्याचे दोन लोखंडी सुरे,असा एकूण 31 हजार 28 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच आरोपी रशीद कमाल मोहम्मद ताहीर व शहबाज रशीद कमाल रा शेख बूनकर कॉलोनी कामठी विरुद्ध कलम 11(1),(ल)पशु क्रूरता अधिनियम सह कलम 5(क)9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. ही यशस्वी कारवाई डीसीपी संदीप पखाले, एसीपी अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,एपीआय सचिन यादव व सहकारी पथकाने केले असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles