– ०९ गोवंश जनावरांची सुटका, १० लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त
काटोल :- काटोल पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या गौवश जनावरांची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी आदेश ढाब्याजवळ कायेल ते पारडसिंगा रोडवर बॅरिकेटींग लावुन नाकाबंदी केली असता नाकाबंदी मध्ये १२:०० ते १२:३० वाजेच्या दरम्यान ०३ संशयीत वाहने मिळुन आली. पोलीसांनी वाहन थांबवुन तपासणी केली असता वाहन कं १) अशोक लेलैंड कंपनीचे वाहन के एम.एच. ३० ए.बी. ३७८४ चा चालक आरोपी नामे १) योगेश रामचंद्र जुमडे, वय ३७ वर्षे, रा. चिंचर गव्हाण, ता. वरूड, जि. अमरावती हा असुन वाहन क.२) टाटा एस वाहन के एम. एच. ४७ ई १६०२ चा चालक आरोपी नामे ०२) चेतन सुभाषराव गुल्हाने वय ३२ वर्षे, रा राजुरा बाजार ता. वरूड जि अमरावती हा असल्याची माहीती प्राप्त झाली. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनात प्रत्येकी ३ असे ६ गोवंश जनावरे (बैल) मिळुन आली. आरोपीतांना जनावरांबाबत अधिक विचारपुस केली असता त्यांनी आरोपी के ३) विश्वास मनोहरराव गुल्हाने, रा. राजुरा बाजार, ता. वरूड, जि. अमरावती याचे मालकीचे असुन त्यांनी ही जनावरे खरेदी केल्याचे सांगितले परतु जनावरांच्या कानाला इअरटेंग लावण्यात आले नव्हते. आरोपींकडे कोणतेही कागदत्रे तसेच जनावर वाहतुका परवाना नव्हता. त्यानंतर पोलीसांना नाकाबंदी दरम्यान वाहन कं ३) टाटा एस वाहन के एम. एच. ४९ डी. ४२९४ हे मिळुन आले नमुद वाहन चालक आरोपी नामे ४) गौतम मनोहर सोनवाने, वय २६ वर्षे, रा. परसोडी, ता. नरखेड, जि. नागपूर हा मिळुन आला.




