spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

2 सख्ख्या बहि‍णींवर नराधमाचा अत्याचार

– महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

पिंपरी-चिंचवड :- पुणे जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं दोन सख्ख्या बहिणींवर शेजारीच राहणाऱ्या एका ६५ वर्षांच्या वृद्धाने लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम मागील दीड ते दोन महिन्यांपासून चिमुकल्या मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवत होता. अत्याचारानंतर तो मुलींना पोट कापायची धमकी द्यायचा. यामुळे पीडित मुली घाबरल्या होत्या. मात्र एका शेजारी राहणाऱ्या महिलेच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रमझान बागवान असं आरोपी वृद्धाचं नाव असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे कुटुंबीय तसेच आरोपीचे कुटुंब मजुरीचे काम करतात. घटनेच्या दिवशी घरातील सर्व जाणती लोकं कामावर गेले होती. यावेळी चौथीतील १० वर्षांची मुलगी आणि तिची ४ वर्षांची लहान बहीण दोघीच घरी होत्या. हीच संधी साधून आरोपी रमझानने १० वर्षांच्या बालिकेला बळजबरीने स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार एका शेजारील महिलेने पाहिला होता. संध्याकाळी मुलीच्या पालकांनी घरी आल्यावर, त्या महिलेच्या सांगण्यावरून विचारपूस केली असता, चिमुकलीने आपबिती कथन केली.

धमकी अन् वारंवार अत्याचार

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने मे महिन्यापासून आतापर्यंत १० वर्षांच्या बालिकेवर तब्बल चार वेळा अत्याचार केला होता. तसेच तिच्या ४ वर्षांच्या लहान बहिणीलाही घरात नेऊन तिच्यावर एकदा अत्याचार केल्याचं समोर आलं. कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची आणि पोट कापण्याची धमकी नराधमाने या पीडित मुलींना दिली होती.

याप्रकरणी पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शेजारी राहणाऱ्या वृद्धानेच अशाप्रकारे दोन चिमुरड्या बहिणींच्या शरीराचे लचके तोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.