वोट चोर गद्दी छोड च्या नाऱ्यांनी दक्षिण नागपूर मध्ये भव्य मशाल मोर्चा बोगस मतदारांच्या पुराव्यासह निवडणूक आयोगाला घेरणार
नागपूर २२ : संपूर्ण भारतात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून समोर आलेला निवडणूक आयोगाच्या गौड बंगाल भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते श्री राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला तोंडघाशी पडत सर्व जनतेला निवडणूक आयोग व भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने निवडणुका जिंकले याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले असून निवडणुक आयोग आता तोंडघाशी पडल्याचे चित्र स्पष्ट झाल्याचे समोर आले. दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात सुमारे 23 हजार मतांचा घोळ झाला असून आम्ही पुराव्यासह निवडणूक आयोगाला धारेवर धरू असे मतं यावेळी काँग्रेस नेते व मागील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार गिरीश पांडव यांनी केले या मशाल मोर्चा मध्ये आज आ. अभिजित वंजारी, माजी नगरसेवक संजय महाकाळकर, योगेश तिवारी, प्रशांत धवड, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे तसेच दक्षिण नागपूर विधानसभा ब्लॉक काँग्रेस कमिटी – 6 च्या वतीने आयोजित वोट चोर गद्दी छोड या मशाल मार्चमध्ये सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते




