spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलीस अधिका-या विरूध्द मानहानीचा दावा

 
प्रशांत वाघमारे, कोठीराम चकोले यांच्या तक्रारीचे प्रकरण
 
कन्हान २२ : –  स्थानिक पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे व पोलिस उपविभागीय अधिकारी संतोश गायकवाड यांनी आरोपी महिलेशी संगणमत करून फिर्यादींनी दाखल केलेल्या अँटॉसिटी दाखल प्रकरण कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी प्रशांत वाघमारे व कोठीराम चकोले यांनी उपरोक्त अधिका-या विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड व कन्हान पोलिस स्टेशनच्या पोलिस निरी क्षक वैजयंती मांडवधरे यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचे सुतोवाच वाघमारे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केेले.
              प्रशांत वाघमारे यांनी २७ जुन २०२५ रोजी अनिता कोठीराम चकोले रा. निलज यांच्या मालकीची बोरी सिंगोरी येथील शेतजमीनीचे ठेकापत्र नियम,शर्ती व अटीनुसार लिहुन घेतले. २० जुलै २०२५ रोजी बोरी सिंगोरी शिवारातील या शेतात काम करण्यासाठी गेले ले मजुर व टॅक्टर बघुन महिला सुलोचना कृष्णा भोले रा. बोरी या आल्या. त्यांनी टॅक्टर चालकास शेतात काम करण्यास मनाई केल्याने टॅक्टर चालकाने प्रशांत वाघमारे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. वाघमारे हे सूरेंद्र पोटभरे व संगिता वांढरे यांना सोबत घेउन शेतात गेले असता तिथे आरोपी महिला सुलोच ना भोले उपस्थित होत्या, त्यांनी वाघमारे यांना बघताच शेतात येण्याची हिम्मत कशी केली, तुझ्या महार जाती चा लोकांना शेती करण्याचा अधिकार कोणी दिला, येथुन गुपचुप निघुन जा, नाहीतर बरे होणार नाही, असे म्हणत जातीवाचक शिविगाळ केली, असे वाघ मारे यांनी सांगितले. यावेळी घटनास्थळी सुरेंद्र पोटभरे व कोठीराम चकोले, त्यांच्या पत्नी अनिता चकोले, संगिता वांढरे आणि टॅक्टर चालक उपस्थित होते. अपमानास्पद वागणुक व जातीवाचक शिविगाळ आरोपी महिला सुलोचना भोले यांनी केल्याने आपण कन्हान पोलिस स्टेशनमध्ये २० जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत २४ जुलै रोजी अँटॉसिटी अंतर्गत ठाणेदार मांडवधरे यांनी गुन्हा दाखल करीत संबंधीतांचे बयाण नोंदवुन घेतले. मात्र आश्चर्य असे की, आरोपी महिलेला तात्काळ तात्पुरता जामीन देण्यात आला, असे पत्रकार परिषदेत वाघमारे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रशांत वाघमारे,  कोठीराम चकोले, कुबेर पोटभरे आदि उपस्थित होते.
   १५ दिवसांनी फिर्यादी विरोधात गुन्हा दाखल
           २४ जुलै रोजी फिर्यादी प्रशांत वाघमारे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी सदर महिले विरूद्ध अँटॉसिटीचा गुन्हा दाखल केला. मात्र तात्काळ जामीनावर तिची सुटका ही केली. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी आरोपी महिलेने फिर्यादी प्रशांत वाघमारे, कोठीराम चकोेले, सुरेंद्र पोटभरे यांच्या विरोधात (जुनी कलम ३५४) ७४, ७५, ८९, २९६, ३५१ (२) बीएनएस अंतर्गत १५ ऑग स्टच्या पहाटेला १२ वाजुन ५८ मिनिटांनी गुन्हा दाखल केला. जेव्हा की अँटॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्या तील फिर्यादी विरूद्ध कुठलाही गुन्हा दाखल करताना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, मात्र पोलिसांनी तशी कुठलिही परवानगी न घेता प्रशांत वाघमारे व इतरां विरोधात गुन्हा दाखल केला, असे पत्रपरिषदेत प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.