यवतमाळ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22, 23 सप्टेंबरला गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळगाव येथे शालेय जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धा संपन्न झाली.
जिल्ह्यातील वय 14 वर्षआतील, 17 वर्षा आतील आणि 19 वर्षा आतील एकूण 219 मुले/ मुली स्पर्धकांनी भाग घेतला. कॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल मधील 14 वर्षा आतील ओपन साईड रायफल मध्ये शिवम महेंद्र राचलवार प्रथम, शिवम गणपत तायवाडे द्वितीय आणि श्रेयस राजू राऊत तृतीय क्रमांक पटकाविला.
एअर पिस्तूल मध्ये श्रेयश विशाल पिंपरे द्वितीय क्रमांक आणि मुलींमधून वेदांती संतोष रावते तृतीय क्रमांक पटकाविला.
जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांमधून सर्वात जास्त लाभ पुरन तांडेकर यांनी100/61 गुण प्राप्त करून 17 वर्ष आतील गटात ओपन एअर रायफल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत अमलोकचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना 4 गोल्ड 4 सिल्वर आणि 2 ब्रांच मेडल मिळाले.
क्लब मध्ये प्रॅक्टिस करणारे स्थानिक महिला विद्यालय, नेपच्यून इंग्लिश मीडियम स्कूल, शिवशक्ती विद्यालय कोठा तसेच पी एम बी इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनियर कॉलेज बाबुळगाव इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून कॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब चे नाव लौकिक केले.
क्लबचे 25 विद्यार्थ्यांनी प्रथमच जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय शूटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.




