spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उत्कृष्ट कामगिरी करणारे २८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

– दीक्षाभूमीवरील बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेची घेतली दखल

नागपूर :- दीक्षाभूमी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडणाऱ्या नागपूर पोलीस दलातील २८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होतात. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अनुयायांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते.या वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्कता, नियोजन व समन्वय राखत आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles