Related Posts

मेयो रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण

<p><strong>&&num;8211&semi; पोलीस कर्मचारी आणि मुलावर हल्ल्याचा आरोप&semi; घटना सीसीटीव्हीत कैद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे&period; नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय &lpar;मेयो&rpar; येथे कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरला पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप आहे&period; ४ नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे&period; या प्रकरणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स &lpar;मार्ड&rpar;ने निष्पक्ष चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली असून&comma; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; रुग्णालयाच्या अपघात विभागात ही घटना घडली&period; त्यावेळी संबंधित डॉक्टर गंभीर प्रकृतीच्या रुग्णावर उपचार करत होते&period; त्यांनी प्राधान्याने त्या रुग्णावर उपचार सुरू केल्याने तेथे उपस्थित असलेला पोलीस कर्मचारी आणि त्याचा मुलगा नाराज झाल्याचे सांगण्यात येते&period; याच कारणावरून दोघांनी डॉक्टरला मारहाण केल्याचा आरोप आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेनंतर संबंधित डॉक्टर तक्रार देण्यासाठी तहसील पोलीस ठाण्यात गेले होते&period; मात्र&comma; तक्रार नोंदवण्यासाठी डॉक्टरांना सुमारे सहा तास प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप मार्डने केला आहे&period; तसेच&comma; मारहाणीची तक्रार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्धच चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे आणि जीवितास धोका निर्माण करणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावाही संघटनेने केला आहे&period; दुसरीकडे&comma; डॉक्टरांच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धही स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणाची गंभीर दखल घेत मार्डने संबंधित पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाला अटक करावी&comma; पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी&comma; अशा मागण्या केल्या आहेत&period; मागण्या पूर्ण न झाल्यास मेयोतील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे&period; महाराष्ट्र मार्डने राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे&period; कोणत्याही पक्षपाताशिवाय तपास सुरू असून&comma; चौकशीनंतरच घटनेचे नेमके वास्तव स्पष्ट होईल&comma; असे पोलिसांकडून सांगण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;