spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुप्रिम इंडस्ट्रिज कंपनीत चोरी करणाऱ्या ३आरोपींना अटक

– ४ लाख ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त  

एमआयडीसी बोरी :- पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथे फिर्यादी नामे मनिष मधुकर रायपुरे, वय ५० वर्षे, रा. नरेंद्र, नगर म्हाडा कॉलोनी, कार्टर नंबर ४१ नागपूर यांनी तक्रार दिली की, एमआयडीसी बोरी येथे वटेघाट शिवार येथे सुप्रिम इंडस्ट्रिज ताडपत्रीची कंपनी असून मागील ०२ महीन्यापासून बंद असल्याचे फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे खुल्या आवारात ठेवलेले सामान असे एकुण १,६५,०००/- रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तोंडी रीपोर्ट वरुन पोस्टे एमआयडीसी बोरी येथे कलम ३०५ (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता हर्ष ए. पोहार, पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि भाग्यश्री घिरवस्सी, उपविभागिय पोलीस अधिकारी, नागपूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी बोरी पोलीसांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करीत गुप्त बातमीदाराच्या माहीतीच्या अधारे दिनांक ०३/०२/२०२६ रोजी आरोपी क. १ रमेश शंकरराव किन्नाके, वय ३४ वर्षे, २. सुरेश नरसिंग यादव, वय २७ वर्षे, ३. प्रमोद चुन्नीलाल उईके, वय ३६ वर्षे, सर्व राहणार वटेघाट, त. हिगणा यांना एमआयडीसी वटेघाट परीसरातून ताब्यात घेवुन त्याचे कडे कौशल्यपुर्ण तपास करीत विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलीसांनी आरोपीला अटक करून आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल किंमती १,००,३००/- रूपये व चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन के एम एच ३१ बी बी ८४७४ किंमत ३,००,०००/- रूपये असा एकुण ४,००,३००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.