नागपूर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू काढणारे तसेच दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू तसेच इतर साहीत्य असा एकुण १४,३१५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस स्टेशन कुही येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन नरखेड येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बेला येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ०३ नोंद केले आहे.
सदर कारवाईत ८१० मिली देशी दारू, १४० लीटर मोहाफुल दारू तसेच इतर साहीत्य असा एकुण १४,३१५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचानामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.




