अरोली :- अरोली पोलीस हद्दीत पेलिग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मसला घोरी टीक रोडने अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मसाला रोड, बसस्टॉप जवळ नाकाबंदी केली असता अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर के एम एच ४९ वी होड ४९४३ हा मिळून आला. वाहन बाबवून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली, वाहन चालक आरोपी नामे वसीम आलम खान, वय ३९ वर्षे, पत्ता, बडेगाव, ता सावनेर, जि नागपुर याला परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही परवाना दाखविला. परवात्याबाबत शाहनिशा केली असता सदर परव्शना हा बानवटी असल्याबाबत समजले, वाहन मालकाचे नाव विचारले असता आरोपी क २. कुणाल अरविद तस्करे, ३८ वर्षे, रा. पलॉट नं ९३ वनराई नगर, मानेवाड़ा वेसा रोड, नागपुर अशी माहीती पोलीसांना प्राप्तशाली वाहन मालकाच्या सांगण्यावरून चालकाने रेतीची चोरटी वाहतुक केल्याची माहीती प्राप्त शाली. पील्लीसांनी पंचासमक्ष टुक मधुन १) १० वास आणि २) टिप्पर के एम एच ४९ वी दीड ४९४३ आणि ३) एक मोबाईल असा एकुण ५०,६०,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.
वाहन तक मारला याम्या विरुध्द पोस्ने अरोली येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्च जमीन महसूल संहिता सह कलम ४,२१ खाण खनिज अधिनियम कलम ०३ सार्व, संपत्ती नुकसान प्रतिबंध अधि, सहकलम ५०/१७७ मो. वा. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी चालकाला अटक करण्यात आली असुन मा न्यायालयाने त्याचा दिनांक ०९/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.




