spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

३२५ किलो प्लास्टिक जप्त

– मनपा पथकाची कारवाई

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात कारवाई सुरू असून उपद्रव शोध (NDS) पथकाद्वारे बिनबा गेट बाहेरील परिसरात असलेल्या वाडी गोल्डन ट्रान्सपोर्ट येथे प्लास्टिकचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवार १३ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास उपद्रव शोध पथकाने बिनबा गेट बाहेरील वाडी गोल्डन ट्रान्सपोर्ट येथे पाहणी केली. पाहणीदरम्यान त्या ठिकाणी १३ पोत्यांमध्ये (प्रत्येकी २५ किलो प्रमाणे) एकूण ३२५ किलो सिंगल यूज प्लास्टिकचा साठा आढळून आला. शासन निर्णयानुसार अशा प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी असल्यामुळे सदर साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला.

या साठ्याबाबत ट्रान्सपोर्ट मालकास विचारपूस केली असता सदर १३ पोती माल हा गाडचांदूर येथील गुरुकृपा या मालकाचा असल्याचे समजले. त्यानुसार संबंधित मालकास चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात उपस्थित राहून दंड भरण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. बंदी असलेल्या एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर प्रभावी कारवाई करण्यासाठी आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या निर्देशानुसार मनपातर्फे विशेष पथके तयार करण्यात आली असून या पथकांकडून शहरात नियमित तपासणी व कारवाई करण्यात येत आहे.

एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा साठा अथवा बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येत असून दिलेली माहिती खरी ठरल्यास ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांनी अशा अवैध साठ्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, प्रभारी स्वच्छता निरीक्षक तथा पथक प्रमुख शुभम खोटे,शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लिवार व पूनम समुद्रे यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.