– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवारी (ता.२५) शोध पथकाने ३६ प्रकरणांची नोंद करून २८ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४०० दंड) या अंतर्गत ९ प्रकरणांची नोंद करून ३ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.४०० दंड) या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून ८०० रूपयांची वसुली करण्यात आली.

वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ९ प्रकरणांची नोंद करून १७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास ११ प्रकरणांची नोंद करून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ५ प्रकरणांची नोंद करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या मे.राकेश पतंग स्टोर्स यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या श्री. दीपक भारभट्ट यांच्यावर आवश्यक कागदपत्रे नसल्याप्रकरणी कारवाई करीत ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या मे.विनय ट्रेडिंग कंपनी यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.




