किशोर साहू, मौदा, ता. २६ :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्टी मंडई निमित्त गांगनेर (हिवरा) येथे आज बुधवार (दि. 26 नोव्हेंबर)ला मंडई उत्सवाला इनामी कुस्त्यांच्या आमदंगलीने दुपारी 2 वाजता पासून सुरुवात होणार आहे. रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत शाहिरा सोनू गायधने विरुद्ध शाहीर सुरज ब्रह्मा नवघरे यांच्या खडीगंमत दुय्यम मुकाबला होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मूळक, माजी आमदार टेकचंद सावरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे, माजी जि. प. सदस्य कैलास बरबटे, शालिनी देशमुख ,देवेंद्र गोडबोले, ग्रामपंचायत खंडाळा सरपंच संकेत झाडे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मण उमाळे,माजी उपसभापती खेमराज छाफले ,भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण, गट ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) सरपंचा अनिता चिंचूलकर ,उपसरपंच मोतीराम घरजाळे ,ग्रामपंचायत सदस्यगण जयसिंग सोनसरे, उमेश राऊत, प्रियंका पौनीकर ,उषा मेश्राम, शुभांगी ठेंगरे, शुभांगी फुले, तंटामुक्त अध्यक्षा मंगला वासनिक, सचिव विनोद वरुडकर ,डॉ. धीरज बाहेश्वर, रेफरी सेवक गडे, देवा सराटकर, कोटीराम चकोले ,शामराव सोनसरे, नथू चिंचूलकर, विंधे सह तालुक्यातील, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या चंपाषष्ठी मंडई निमित्य आयोजित इनामी कुस्त्यांच्या आमदंगल व सांस्कृतिक मंडई कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान गांगणेर व हिवरा येथील समस्त नागरिकांनी केले आहे.




