– सतत पाठपुरावा करून अरोली गाव व परिसराच्या विकास करण्यासाठी तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे भरघोस करोडोंच्या निधी खेचून आणणारे ठरत आहे भागीरथ
किशोर साहू, मौदा, ता. २६ :- जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी संपूर्ण तालुक्यात विविध विकास कामे मंजूर करणे व त्यांचे भूमिपूजन करणे या दोन्ही कामांच्या धुमधडाका सुरू आहे.ग्रामपंचायत अरोली येथे ही विविध विकास कामांसाठी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी 1 करोड 80 लक्ष रुपये मंजूर केले असून मंजूर कामांमध्ये कौशल्य विकास केंद्र (समाज भवन 75 लक्ष), आरोग्य उपकेंद्र 45 लक्ष, वार्ड क्रमांक 3 येथे नाला बांधकाम 30 लक्ष, बाजारपेठ विकास करणे 15 लक्ष, शिवमंदिर परिसर विकास (समाज भवन 15 लक्ष) या कामांचा समावेश आहे. ही कामे मंजूर होण्यासाठी सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांनी संबंधित विभागाला व राज्यमंत्री जयस्वाल यांना ठराव व निवेदने दिली होती. या कामांच्या सतत पाठपुरावा राज्यमंत्री जयस्वाल यांच्याकडे करून तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे हे अरोली गाव व परिसरासाठी भरघोस करोडोंच्या निधी आणणारे भागीरथ ठरत आहे.
या कामांचे भूमिपूजन प्रसंगी तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे, सरपंचा रोशनी प्रशांत भुरे, उपसरपंच सुनील आडगुलकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य गण, डॉ.महल्ले, डॉ. सारिका राऊत, डॉ.राऊत, आरोग्य सेविका नरांजे, समस्त आशा वर्कर, तसेच गावातील नागरिक गणेश बावनकुळे, दिनेश गुरनुले ,ईश्वर निमकर, शिवाजी मदनकर, अशोक वाडीभस्मे, रामप्रसाद डोकरी मारे ,प्रदीप फटिंग ,अर्जुन डहारे, पंकज चुन्ने ,राधेश्याम मेहर, आकाश बावनकुळे ,पिंटू बावनकुळे ,पुरुषोत्तम कुंभलकर, मारोती फटिंग ,दिलीप श्रावणकर, देवराव मेहर, सलाम कुरेशी, दिनेश मोहतुरे ,बापूराव गिरडकर, धनराज मेहर ,रामेश्वर मरघळे ,शिवशंकर बोरकर ,सचिन कारेमोरे ,शिवदास मदनकर प्रामुख्याने उपस्थित होते.








