Home Latest News किट्स (स्वायत्त) चा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

किट्स (स्वायत्त) चा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
72

सचिन चौरसिया, रामटेक :- कविकुलगुरू इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी अण्ड सायंस (किट्स) युजीसी स्वायत्त महाविद्यालय रामटेकचा ४० वा वर्धापन दिवस शुक्रवार (दि.१९) किट्सच्या सिल्व्हर जुबली हॉल मध्ये साजरा झाला. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत व्ही. राजेश्वरराव यांना अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून वर्धापन दिवसाचे उद्‌घाटन प्रमुख वक्ते व व्हीएनआयटी नागपूरचे प्रा.डॉ राहुल रालेगांवकर यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाची अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली. या वेळी प्रामुख्याने आयक्यूएसी चे डीन डॉ. यशवंत जिभकाटे, विद्यार्थी डीन डॉ. पंकज आष्टणकर, विद्या विभाग डीन डॉ. विलास महात्मे सहीत विविध विभागाचे डीन,विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ. राहुल रालेगांवकर यांनी ग्रामिण ते जागतीक अभियांत्रिकी शिक्षणातील परिवर्तन या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले की शिक्षणातून भविष्याची भक्कम पायाभरणी झाली पाहीजे. विद्यार्थ्यांनी सतत स्टार्टअप व संशोधन केले पाहीजे. संशोधन हे जनकल्याण करीता असावे. आताचे जग हे स्पर्धात्मक युग आहे. किट्सची प्रशंसा करताना म्हणाले की ४० वर्षाच्या कालावधीत किट्स ने चांगले विद्यार्थी दिले. त्याचा फायदा जनसामान्यांना झाला आहे.

प्रस्तावना प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे यांनी केली.ते म्हणाले की किट्स रामटेकचे उद्‌घाटन भारत रत्न व पूर्व पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी १९८५ ला केले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत व्ही. राजेश्वरराव यांच्या दूरदृष्टी तून व सचिव व्ही.श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनातून संस्थेला ए ग्रेड मिळाला व संस्था स्वायत्त झाली आहे. किट्स मधे यंदा १०० टक्के प्रवेश झाले व किट्सच्या विद्यार्थाना विविध कंपन्या मधे मोठ्या प्रमाणात नौकऱ्या मिळत आहेत. संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव व संचालक व्ही. प्रणव यांच्या मार्गदर्शनात संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षणासहित सर्व सोयी एकाच छताखाली देत आहे. स्वायत्ततेमुळे उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. प्रमुख अतिथीचा परिचय डॉ पंकज आष्टणकर तर कार्यक्रमाचे संचालन मनशिखा नितनवरे व आभार प्रदर्शन डॉ विलास महात्मे यांनी केले.