Home Latest News पहिला टप्पा पांदण रस्तेविषयक मोहिम, जिल्हाधिकाऱ्यांची महादुला ग्रा.पं.ला भेट

पहिला टप्पा पांदण रस्तेविषयक मोहिम, जिल्हाधिकाऱ्यांची महादुला ग्रा.पं.ला भेट

0
67

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राज्यभर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पहिला टप्पा पांदण रस्तेविषयक मोहिम तालुक्यात सुरू आहे. त्या अनुषंगाने दि. २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी रामटेक तालुक्यातील कार्यालय, महादुला येथे प्रत्यक्ष भेट देऊन येथील पांदण रस्त्यांची पाहणी केली.

यावेळी रोवरद्वारे भूमी अभिलेख विभागामार्फत पांदण मोजणी व सिमांकन करण्यात आले तसेच मोजणी केलेल्या पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरोपण करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारबोडी ग्रामपंचायत अंतर्गत सालईमेटा या गावालाही भेट दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे २०२२’ मौजा सालईमेटा येथील रहिवासी प्रयोजनसाठी शासकीय जमिनीवरील केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करून जागेचे भुखंड पट्टे लाभार्थ्यांचे घरी जावून लाभार्थ्यांची भेट घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी एसडीओ प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे, बीडीओ जयसिंग जाधव, अप्पर तहसीलदार पुनम कदम, माजी जि.प. सदस्य संजय झाडे, महादुला सरपंच शरद डडूरे, भंडारबोडी सरपंच सुनीता मिसार, नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, अमित निबांळकर, महेश कुलदीवार, मंडळ अधिकारी भूषण निखाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी मारोती भुजाडे, ग्राम महसूल अधिकारी पाटील, ग्रामपंचायत अधिकारी ठवरे, पंजाब चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.