Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 41 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 41 प्रकरणांची नोंद

0
27

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता. 17) शोध पथकाने 41 प्रकरणांची नोंद करून 30,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 26 प्रकरणांची नोंद करून 10,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 200 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 800 रूपयाची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग-बोर्डिगचे हॉटेल, सिनेमाहॉल,मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. वर्कशॉप गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकाने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 1,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. हायफिल्ड इन्फ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. ग्रीन लाईन मेडप्लस यांनी अपार्टमेंटमधील सांडपाणी थेट ड्रेनेज लाइनला जोडल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. स्वप्ना शिल्प डेव्हलपर्स यांनी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. श्री राम एंजसी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. दिशा नर्सिंग कॉलेज यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. रोनिसेंट पार्टनशिप एलएलपी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000 दंड वसुल केला.