मृत कामगाराच्या कुटुंबीयांना 42 लाखांची मदत, आंदोलकांपुढे झुकले एनटीपीसी प्रशासन 

0
66
किशोर साहू :मौदा, ता. ३ : मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पात कामावर असताना आकाश विनायक रंगारी यांच्या मृत्यू झाला. प्रशासन ही बाब मानायला तयार नव्हती. शेवटी ग्रामस्थांनी कामगारांसह  गेट समोर आंदोलन केले. अखेर कुटुंबीयांना 42 लाख रुपयाची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्यास एनटीपीसी प्रशासन तयार झाले.खंडाळा (गांगणेर) चे तडफदार सरपंच तथा गांगनेर उपकेंद्र आरोग्य समितीचे अध्यक्ष संकेत झाडे, भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण, प्रहार संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांनी केलेले प्रयत्न व पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन यशस्वी झाले.
गुरुवारी (28 ऑगस्ट )निमखेडा येथील रहिवासी आकाश विनायक रंगारी (33) एनटीपीसी मध्ये काम करीत असताना विजेच्या धक्का बसला .उपचारार्थ रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर एनटीपीसी ने हृदयविकाराच्या धक्का असल्याचे सांगत आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे निमखेडा गावात व कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. याबाबत खंडाळा (गांगणेर) चे तडफदार सरपंच तथा गांगनेर उपकेंद्र आरोग्य समितीचे अध्यक्ष संकेत झाडे ,भाजपचे चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण, नागपूर प्रहार संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांनी पुढाकार घेतला .शुक्रवारी (29 ऑगस्ट) निमखेडावासियांना घेऊन एनटीपीसी गेट समोर आंदोलन केले . शवविच्छेदन अहवाल सादर केला .मौदा पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड व मौदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांनी मध्यस्थी केल्यानंतर एनटीपीसीचे एच आर विभागप्रमुख सागर रंजन साहू यांनी आकाश यांच्या कुटुंबीयांना 42 लाख रुपयांची मदत व एकाला नोकरीचे आश्वासन दिले. यावेळी उमेश शेंडे, आकाश पाणतावणे, सिन्नु  यागंटी, बंटी वासनिक, दत्तू रंगारी, मंगेश चाफले, कमलेश रंगारी, हेमराज चाफले, अशोक बावनकुळे ,चक्रधर आकरे अनुप नारनवरे, विपिन मेश्राम ,शरद रंगारी सह अनेक कामगारांची उपस्थिती होती.