spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या 50 गुणवंत स्वच्छता दुतांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

– शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये

नागपूर :- मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे 31 जुलै या शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त शहरातील प्रत्येक झोनमधील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या 5 सफाई कर्मचारी अशा 10 झोनमधील एकूण 50 सफाई कामगारांचा सत्कार महापौर निता ठाकरे, उपमहापौर  लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती रुतिका मसराम, महिला व बाल कल्याण विशेष समितीच्या सभापती सारिका नांदूरकर, नगरसेवक मनोज साबळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मुरुगनंथम एम. यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे व 5 हजार रुपये रोख असे या सत्काराचे स्वरुप होते. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह प्रत्येक झोनचे स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

सफाई कामगार शहर स्वच्छतेचा कणा- महापौर

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या, सफाई कर्मचारी म्हणून उत्कृष्ट काम करणार्या शहरातील 50 सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार हा त्यांच्या कामाची पावती आहे. हे तुमचे कार्य अभिनंदनीय आहे. तुमचे उत्कृष्ट काम हे इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका आहे. शहराच्या स्वच्छतेचा हा एक प्रकारे कणा आहे. आपण इतरांना सुद्धा चांगले काम करण्यासाठी प्रेरित करावे व यातून नागपूर शहर स्वच्छतेच्या कसोटीवर सर्वोत्कृष्ट करण्यासाठी आपण कटिबद्ध राहावे, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी यावेळी केले.

प्रारंभी महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दीप प्रज्वलन केले. मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी महापौर ठाकरे, उपमहापौर हाथीबेड, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. प्रास्ताविक मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले. यावेळी त्यांनी हा दिवस दरवर्षी महानगरपालिकेत साजरा होत असल्याची माहिती दिली. उत्कृष्ट काम करण्याच्या निकषांवर गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून निवड केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अरुण तुरके यांनी केले तर आभार प्रवीण तंत्रपाळे यांनी मानले.

शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त सत्कार करण्यात आलेल्या 50 गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांची झोननिहाय नावे पुढीलप्रमाणे.

झोन क्र १ लक्ष्मीनगर

अंबादास तुकाराम लोखंडे

अरुण विजाराम मेश्राम

दिलीप नामदेव उके

किरण अमरसिंग अरखेल

सुशीला रंजु बक्सरीया

झोन क्र २ धरमपेठ

गीता धारासिंग चावरीया

सुमित्रा मुन्ना महातो

राजकुमार आत्माराम मेश्राम

रायभान कवडू हिरेखान

रामराव पुंडलिक बालपांडे

झोन क्र ३ हनुमाननगर

सतिश नत्यु वायमार

शुंभम हरीरचंद्र मस्ते

गिता अशोक तुर्केल

किशार बुध्देलाल मात्रे

अरुण देवराव मेश्राम

झोन क्र ४ धंतोली

शिला अरुण परिहार

कैलास तुकडोजी रंगारी

महेन्द्र वंसत मोगरे

अनिल ईश्वर घरडे

अजय राजु डागोर

झोन क्र ५ नेहरुनगर

मनोज सूर्यभान रंगारी

रत्नगुंफा चंद्रमणी ढाकणे

शिला गुंडेराव श्रीरामे

कोमल मन्साराम खोब्रागडे

ललिता सुर्यभान मांडवकर

झोन क्रमांक ६ गांधीबाग

ज्योती राजा शेंद्रे

शिल्पा रुपचंद श्रीरामे

सचिन माधव लोखंडे

प्रविण भिवाजी मोटघरे

सुनिल होरीलाल बिरहा

 झोन क्र ७ सतरंजीपुरा

छगन कवडू कांद्रीकर

रामदास बल्लु मखोरीया

संगिता दिलीप गौतेल

बंटो हेमचंद मलिक

विवेक हेमराज चौधरी

 झोन क्र ८ लकडगंज

व्यंकटी माधव ठवरे

कमलाकर बाबुराव वंजारी

माया बैरीसाल

विजय भैयाजी जामगडे

राजकुमार सिताराम मेश्राम

 झोन क्र ९ आशीनगर

सुनंदा उमेश मेश्राम

राजकुमार कवडुजी डोंगरे

राजेश दौलत पाटील

नैना जांभुळकर

अनिता वासे

झोन क्र १० मंगळवारी

संतोष फागो साठवणे

संजय मधुकर बहुते

बंडु राघोबा चिकणे

दिनेश ठवरे

रामकृष्ण अर्जुन बोरघरे

Popular Articles