spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गरजू, वंचितांना मिळाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा घेतला लाभ

– राज्य अन्न आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

नागपूर :- राज्य अन्न आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग, परित्यक्ता, विधवा, निराधार महिला तसेच वृद्ध नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, आयोगाचे सदस्य ईश्वर बाळबुधे, अप्पर जिल्हाधिकारी तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्डांचे वितरण करण्यात आले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles