– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवारी (ता.५)शोध पथकाने 51 प्रकरणांची नोंद करून 38,300 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 8,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू.300 रूपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणीकचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 2,800 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमा हॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 12,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता,मंडप,कमान,स्टेज इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरिता रस्ता बंद करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयाची वसुली करण्यात आली. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच बांधकामा दरम्यान चेंबर क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 1,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. पार्क व्हियु 30 यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. ऑरकीड इंफिनीटी यांनी बांधकामा दरम्यान चेंबर क्षतीग्रस्त केल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.एसआयआयटी टयुटोरियल्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. लिटील मिलीनियम यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.
गांधीबाग झोन अंतर्गत मे. कलश स्वीटस् व मे. दुर्गेश स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.सोनकुसरे किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत हेमंत मोहालालजी यांनी अनधिकृत भुखंडावर कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हॉटेल बारबेक्यु, मे.हॉटेल फुस्टॉन व मे.वेलवीटोज् कॅफे यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे च शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.15,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू.60,000 दंड वसुल केला.