– रामधाम येथे थाटात पार पडला आदर्श सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा
– आपल्या उत्पन्नात्त्या १०% खर्च सामाजिक कार्यावर
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- मनसर रामधाम येथे मंगळवार (दि.२१) एप्रिलला चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम, मनसर तथा आधार बहुउद्देशीय संस्था, महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने आदर्श सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी तब्बल ५१ जोडप्यांचे शुभमंगल सावधान झाले. यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, संध्या चंद्रपाल चौकसे, गौरव चौकसे, खासदार माया इनवाते, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन सह विविध राजकिय मंडळी तथा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभमंगल कार्य पार पडले. विशेष महणजे रामधाम येथे आजपर्यंत पार पडलेल्या आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात आजपर्यंत १३६६ जोडप्यांचे शुभमंगल झालेले असून . त्यात यंदाच्या ५१ जोडप्यांची आणखी भर पडली. ज्यांची लग्न करायची आर्थिक सोय नाही. अशा हजारो जोडप्यांचे येथे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे हे रामधाम येथे निशुल्क विवाह आटपवुन देतात. हे येथे उल्लेखनिय. गेल्या कित्येक वर्षापासुन त्यांचे हे कार्य अविरत सुरु आहे. चंद्रपाल चौकसे म्हणाले की आईच्या सांगण्यानुसार आपल्या उत्पनाचा १०% वाटा ते सामाजीक कार्यावर खर्च करीत असतात व करीत राहतील. २१ एप्रील ला सकाळी साडेदहा दरम्यान मनसर येथील जिल्हा परिषद शाळेतुन नववर वधुची वरात निघाली होती. ती मनसर गाव भ्रमण करीत रामधाम येथे पोहोचली. यानंतर मंडपाच्या गेटवर सर्व जोडप्यांचे चंद्रपाल चौकसे, पत्नी संध्या चौकसे तथा मुलगा गौरव चौकसे यांचेतर्फे स्वागत करण्यात आले. खासदार माया इनवाते स्टेजवर उपस्थित होताच दीपप्रज्वलन आणि मंगलाष्टके होऊन परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यादरम्यान येथे परीसरातील हजारो नागरीक उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था तथा वधु-वरांना आहेर सुद्धा देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश देणारा हा सामूहिक विवाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला. संचालन अनील वाघमारे यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये मुख्य अतिथी खासदार माया इनवाते, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, राजु राऊत, नगरसेवक विश्वास पाटील, महेश बम्हनोटे, दुर्गाताई सरियाम यांच्यासह राजकीय मंडळी उपस्थित होती.
जिवंत असेपर्यंत सामूहिक विवाह कार्य सुरूच राहतील : चौकसे
एक लग्न कार्य उरकवतांना पालकांची आर्थिक तथा सर्वपरिने अक्षरशः दमछाक होत असते. मात्र चंद्रपाल चौकसे यांनी आजपावेतो हजारो विवाह सोहळे मोठ्या सहजतेने उरकविले असुन या कार्याबद्दल ते परीसरात कौतुकाचे मानकरी ठरलेले आहे. हे कार्य ते जिवंत असेपर्यंत सुरु ठेवणार असल्याचेही ते लग्नसोहळ्या दरम्यान बोलले. यानंतर चंद्रपाल चौकसे यांनी प्रभू श्रीरामाला या परिसरात उद्योगधंदे निर्मिती होवो अशी प्रार्थना केली. तसेच विवाह सोहळा दरम्यान येथे हजारो लोक येतात. आज येथे ५१ जोडप्यांचा विवाह होत आहे. हे लोक मला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे मला कशाचीच कमतरता नाही असेही चौकसे यांनी याप्रसंगी सांगितले.