– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता.2) शोध पथकाने 55 प्रकरणांची नोंद करून 39,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १०० दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 800 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे, लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर यांनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 20,000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटनविकेरता, यांनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस,व इतर दुरूस्तीचे व्यावयिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून रु.5,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. सीम्स हॉस्पीटल यांनी बायोमेडिकल वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकल्यामुळे रू. 25,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत तुषार भोमर यांनी फुटपाथवर तात्पुरते झोपडे उभारल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. टी.टी.एम अकॅडमी यांनी विनापरवानगीने विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. नुरी प्लाजा यांनी अनधिकृत भुखंडावर कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. कविता स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अशोक प्लास्टीक यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. शक्ति प्राईड होम्स अपार्टमेंट व मे. हसन बिल्डकॉन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे प्रत्येकी रू.10,000 या प्रमाणे रू. 20,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.70,000 दंड वसूल केला.




