केळवद :- स्थानीक सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत ५८.४५ टक्के मतदान झाले.केळवद येथे एकुण पाच वार्डामध्ये ६६८७ मतदान आहे.त्यापैकी ३९०९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.पारा ४२ अंश सेल्सिअसच्यावर असुन सुध्दा केळवद येथील मतदारांनी मतदान केले.केळवद येथुन सरपंच पदाकरिता सर्वसाधारण प्रवर्गातुन चार उमेदवार रिंगणात होते. केळवद ठाणेदार आशिषसिंह ठाकुर यांच्या कडक बंदोबस्तामधे दंगापथक तैनात होते. निवडणुक पुर्णपणे शांततेत पार पडली.२९एप्रिल मंगळवारला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.








