कामठी 1 :- कामठी नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.त्यानुसार 18 ऑगस्ट रोजी कामठी नगर परिषद च्या 17 प्रभागाची नवीन प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या प्रभागाच्या प्रारूप रचनेवर आक्षेप व हरकती मागविण्यासाठी आज 31 ऑगस्ट दुपारी 3 वाजे पर्यंत ची शेवटची वेळ होती त्यानुसार 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत या प्रारूप प्रभाग रचनेवर कामठी नगर परिषद कडे 66 आक्षेप नोंदविण्यात आले.
मागील तीन वर्षांपासून निवडणुका रखडून पडल्याने कामठी नगर परिषद वर प्रशासक राज सुरू आहे त्यामुळे हे प्रशासकीय राजवट केव्हा पर्यंत कायम राहणार व कामठी नगर परिषद ची निवडणूक केव्हा होणार याकडे सर्व कामठी वासीयांचे लक्ष वेधले होते . त्यातच ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने निडणुकांचा मार्ग मोकळा झाला.न्यायालयांच्या आदेशान्वये निवडणूक विभागाने निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली.त्यानुसार कामठी नगर परिषद तर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे काही इच्छुकांची धाकधूक वाढली आहे तर काहींना दिलासा मिळाला आहे.या नविन प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने 31 ऑगस्ट पर्यंत चा वेळ दिला होता.त्यानुसार 66 आक्षेप कर्त्यांनी आक्षेप नोंदविला



