spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बुटीबोरीत एकच रात्री चार घरफोड्या

दोन दुचाक्या सह ४० हजाराचा मुद्देमाल लंपास
बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत एस के जी स्टाफ कॉलनी येथील घटना
बुटीबोरीत चोऱ्यांचे वाढते सत्र, नागरिकांत दहशत
संदीप बलवीर, नागपूर 1 :- घरी कुणी नसल्याची संधी साधून मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यानी कामगारांच्या वसाहतीत घरपोड्या करून दोन दुचाक्या सह ४० रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत एस के जी स्टाफ कॉलनी येथे दि ३० ऑगस्ट च्या मध्यरात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार घटना अशी की, फिर्यादी वैभव उमेश भिवंडे,वय (३९), रा प्रभाग क्रं ७, एस के जी खोली क्रं ए २/४,तह जी नागपूर हे एस के जी रिफ्रांक्टोरीज कंपनीत काम करतात. घटना दिनी त्यांनी त्यांची काळ्या रंगाची होंडा शाईन कंपनीची दुचाकी क्रं एम एच ४०, ए पी १८१७ हिला रात्री नऊ वाजता दरम्यान राहत असलेल्या क्वार्टर समोर हॅण्डल लॉक करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता दरम्यान बाहेर बघितले असता त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी त्यांची गाडी दिसून न आल्याने त्यांनी शेजारी व वॉर्डात शोधाशोध केली परंतु गाडी मिळून आली नाही.तसेच क्वार्टर क्रं बी २/२ शेजारी राहत असलेले सूर्यकांत छोटेलाल पांडे, वय (४९) यांचे नावे असलेली काळ्या लाल रंगाची होंडा शाईन दुचाकी क्रं एम एच ४० सी व्ही ३६७८ ही सुद्धा त्यांनी ठेवलेल्या जागेवर दिसून न आल्याने संपूर्ण कॉलनी मध्ये चर्चा सुरु असतांना च कॉलोनीतच राहत असलेले नीरज तिवारी, राजेंद्रसिंग शेखवत, जमील अहमद व निखिल गोमासे यांच्या क्वार्टरच्या दाराच्या कुंड्या तोडून दार उघडे असल्याचे दिसून आले. यात नीरज तिवारी यांचे घरून चिल्लर दोन हजार रुपये व १५०० रुपये किमतीचे चांदीचे तीन शिक्के व दोन कडे, राजेंद्रसिंग शेखवत यांचे कडून ४५०० रुपये, निखिल गोमासे यांचेकडे कुठलेही किंमती सामान नसल्याचे सांगतले तर जमील अहमद कडे चोरांना  चोरण्यालायक कुठलीही किंमती वास्तू मिळाली नसल्याने घरातील सामान अस्तव्यस्त करीत निघून गेले.
बंद घरात दरोड्याच्या मनसूब्याने आलेल्या चोरांना चार घर फोडूनही त्यांच्या हाती काहीही न लागल्याने शेवटी कॉलोनीत घरासमोर उभी असलेली वैभव भिवंडे यांची १० हजार रुपये किंमत असलेली व सूर्यकांत पांडे यांची २२ हजार रुपये किंमत असलेली अशा दोन दुचाक्यासह एस के जी क्वार्टर मधील चार क्वार्टर चे दरवाजाचे लॉक तोडून व घरात प्रवेश करून दोन क्वार्टर मधील नगदी ६५०० रुपये व चांदीच्या वस्तु १५०० रुपयांच्या अशी एकूण ४० हजार किमतीचा मुद्देमाल घेऊन लंपास झाले.सबब गुन्हाची तक्रार बुटीबोरी पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली आली. पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद घेतली असून पुढील तपास बुटी बोरी पोलीस करीत आहे.

महिलांवर्गात भीतीचे वातावरण, पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
एकाच रात्री चार घरे फोडून मुद्देमाल लंपास केल्याचे वृत्त बाहेर पडताच वसाहतीतील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण येथे राहणारे बहुतेक कुटुंब औधोगिक क्षेत्रात कामगार म्हणून पाळीत काम करतात. त्यामुळे येथील घरातील पुरुष अनेकदा रात्रपाळीला कामावर जात असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी जर घरात चोर शिरले तर घरातील महिला त्यांचा कसा प्रतिकार करेल. म्हणून महिला वर्गात भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे.

बुटीबोरी पोलीस रोज रात्रीला गस्तीला असतात. परंतु चोरी झालेले ठिकाण रोडपासून दूर व निर्जन स्थळी असून तिथे सी सी टी व्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक सुद्धा नाही. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांनी सी सी टी व्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक नेमावे. आम्ही गुन्हातील आरोपीचा लवकरच छडा लावू व चोरी गेलेल्या दुचाक्या मिळवून देऊ
प्रताप भोसले, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, बुटीबोरी.

चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच बुटीबोरी नगरपरिषद चे माजी सभापती मंदार वानखेडे व एस के जी कंपनीचे व्यवस्थापक सुधीर हरकरे यांनी घटनास्थलांना भेट दिली.वसाहतीत वारंवार होत असलेल्या चोऱ्यानवर आळा घालण्यासाठी  येथे सी सी टी व्ही कॅमेरे असणे गरजेचे असून अर्धा खर्च एस के जी कंपनी तर्फे उचलण्याची तयारी दर्शविली व उर्वरित खर्च कॉलोनीतील नागरिकांनी लोकसहभागातून करावा असे ठरविण्यात आले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.