सायबर वरियर्स व प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम
संदीप बलवीर, टाकळघाट 1 :- आजच्या एनड्रॉइड मोबाईल व संगणकीय युगात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशात रोज शेकडो सायबर गुन्हे घडत असून, या गुन्हाना कुठे तरी आळा बसावा व जनमानसात याबाबद जागृती निर्माण व्हावी म्हणून सायबर वरियर्स व प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विध्यमाने टाकळघाट येथील श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने विद्यालयात सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.
सबब कार्यक्रम क्विक हील फाउंडेशन व महाराष्ट्र सायबर यांच्या सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा मोहिमेअंतर्गत पार पडला. या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून जागरूक करणे हा होता.यावेळेस शाळेचे मुख्याध्यापिक अंकुश वासाड यांनी आपले विचार व्यक्त करताना आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी जागरूक करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओळख चोरी, सायबर बुलिंग याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मजबूत पासवर्ड तयार करणे, संशयास्पद लिंकपासून सावध राहणे, सोशल मीडियावरील प्रायव्हसी सेटिंग्ज अपडेट करणे यासारखे प्रत्यक्ष जीवनातील उपाय देखील सांगण्यात आले.सत्र अधिक प्रभावी करण्यासाठी वास्तविक उदाहरणे, प्रश्नोत्तर सत्र व विविध उपक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाला एल टी जे एस एस चे चेरमन डॉ. सतीश चतुर्वेदी, साची डॉ. आभा चतुर्वेदी, निर्देशक दुश्यंत चतुर्वेदी, अभिजीत देशमुख, डॉ. विवेक ननोती प्रियंदर्शनी अभियांत्रिकी महाविद्याहालायचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण धाले, डॉ. भाग्यश्री धरास्कर तसेच क्विक हील फाउंडेशन कडून अनुपमा काटकर अजय श्रीके व गायत्री केसकर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. त्यांनी सायबर वॉरियर्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले




