spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ७६ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ७९ मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता.३) शोध पथकाने ७६ प्रकरणांची नोंद करून ३५,८०० रुपयाचा दंड वसूल केला.

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. ४०० दंड) या अंतर्गत २२ प्रकरणांची नोंद करून ८८०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. १०० दंड) या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून २०० रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. ४०० दंड) या अंतर्गत ७ प्रकरणाची नोंद करून २८०० रूपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून ८००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून रू.१०००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास ३० प्रकरणांची नोंद करून रू. ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. क्लासिक अपार्टमेंट यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी रु.१०,००० चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. वसंत अपार्टमेंट यांच्यावर पादचारी मार्गावर बांधकाम व पाडकाम साहित्य टाकून अस्वच्छता पसरविल्या प्रकरणी रु.५,००० चे दंड वसुल करण्यात आले. तर मे.डी-मार्ट आणि मे. दर्ता स्काय यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी प्रत्येकी रु.१०,००० चे असे एकूण रू. २०००० चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. एक्सिलेंट ट्युशन क्लासेस यांच्यावर विद्युत खांबावर अनधिकृतरित्या फलक लावण्याप्रकरणी रू. ५,००० चा दंड वसूल करण्यात आला. तर मे. राज किराणा स्टोअर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५००० चा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ०६ प्रकरणांची नोंद करून रू. ४५ ००० दंड वसुल केला.

Popular Articles