नागपूर :- दर्शन कॉलनीत नंदनवन ही एक नागपूर सुधार प्रन्यास ची विकसित लेआउट असून येथे एक भव्य भूखंड दवाखाना तथा प्राथमिक शाळेकरीता आरक्षित आहे. दवाखाना हेतू आरक्षित जागेवर एक छोटे आरोग्य केंद्र आमदार निधी द्वारा नियमित केलेले आहे. व त्या आरोग्य केंद्राला उत्तम प्रतिसाद सुद्धा आहे. त्या जागेच्या बाजूला एक प्राथमिक शाळा सुद्धा बांधलेली आहे. व ती शाळा जवळपास वीस वर्षापासून बंद पडलेली आहे. त्या जागेचा इतर लोक गैरवापर करीत असून तेथे असमाजिक तत्त्वांच्या लोकांना त्रास सुद्धा होत आहे. येथील नागरिकांनी त्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळेला एक भव्य शासकीय रुग्णालयामध्ये परिवर्तित करण्याची मागणी केली जात आहे. पूर्व नागपूर मधील आमदार कृष्णा खोपडे तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी सुद्धा या शाळेला रुग्णालयामध्ये परिवर्तित करण्याचे अनुमोदन केलेले आहे. परंतु मनपानी यावर काहीच कारवाई केलेली नाही. वाढती वैद्यकीय चिकित्सा व खाजगी रुग्णालयाद्वारे गरीब मध्यमवर्गीय लोकांचे शोषण व सहकारी योजनेची अवहेलना लोकमाथ करिता सरकारी दवाखाने हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. मनपाच्या आरोग्य विभागाखाली या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधून या बंद पडलेल्या शाळेला एक भव्य रुग्णालयांमध्ये परिवर्तित करण्याची मागणीकरून तेथील नागरिकांना भव्य रुग्णालय निर्माण करून या जागेचा योग्य उपयोग घेता येईल. यापूर्वी 5 जुलै 2024 मध्ये महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिषेक चौधरी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनंतर 2 ऑगस्ट 2024 मध्ये मा.निगम आयुक्त मनपा नागपूर यांच्या नावे या बाबतीतील निवेदन देण्यात आले होते. यासंदर्भात खासदार मा.नितीनजी गडकरी यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले होते की, यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. परंतु आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केले व सांगितलेले काम मार्गी लावले नाही. म्हणून परस्पर बातमी वृत्तपत्रातच्या माध्यमातून प्रकाशित व्हावी. यासाठी ते परिश्रम घेत आहे. असे येथील एक सामाजिक कार्यकर्ते मारोतराव शनिवारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
दर्शन कॉलनी येथील बंद पडलेली प्राथमिक शाळेला रुग्णालयामध्ये परिवर्तित करण्याची मागणी – मारोतराव शनिवारे









