spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान परिसरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहा ने साजरा

कन्हान :- परिसरात भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा प्रजा सत्ताक दिन सोहळा शासकिय कार्यालय, शाळा, महा विद्यालय, राजकिय, सामाजिक संस्था व्दारे मान्यवरां च्या हस्ते महापुरूषाना अभिवादन करून ध्वजारोहन करून विविध कार्यक्रमाने स्वातंत्र दिवस उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.

कन्हान शहर विकास मंच द्वारे ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात

कन्हान शहर विकास मंच व्दारे ७७ वा प्रजा सत्ताक दिवस गांधी चौक येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष मंच चे मार्गदर्शक भरत सावळे, प्रमुख अतिथि निलकंठ मस्के, सुर्यभान चकोले यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपति शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी राष्ट्र ध्वज तिरंग्याला सलामी आणि राष्ट्रगीत गायन केले. अर्चना तांडेकर सह मान्यवरांनी प्रजासत्ताक दिवसी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तदंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन करित प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. संचालन व आभार प्रदीप बावने यांनी केले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, नारायण गजभिये, सुरज वरखडे, नाना ऊकेकर, चिंतामण शेंडे, महिला सदस्य मीना गिऱ्हे, सुषमा मस्के , रंजना किरपाने, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, यश शेंडे, माहेर इंचुलकर, रविंद्र कोचे, रुपेश मेश्राम, अभय ऊके, रुजल मेश्राम, प्रियांशु वाघमारे, प्रशांत मेश्राम, मयुर बावणे आदि सह नागरिक उपस्थित होते .

श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान

सोमवार (दि.२६) जानेवारी २०२६ ला श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे प्रजासत्ता क दिवसी शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मुख्याध्यापिका वंदना रामापुरे, अभिजित डांगोरे, आरती डांगोरे, अतुल ढोके, स्मिता सोनारे, अधिक्षक गणेश रामापुरे उपस्थित होते. तदंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यात देश भक्तीपर गीत, नुत्य, भाषणे आदी विविध कार्यक्रमाने उपस्थिताना विद्यार्थ्यानी मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक हेमंत वंजारी यांनी तर आभार नेहा गायधने यांनी व्यकत केले. कार्यक्रमास जयश्री पवार, गीता वंजारी, कीर्ती वैरागडे, योगिता चांदेवार, स्वर्णा रामापुरे, अभिषेक वंजारी, भास्कर सातपुते, पवन ठमके आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वृंद उपस्थित होते.

यशवंत विद्यालय वराडा

यशवंत विद्यालय वराडा येथे शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर यांचे अध्यक्षेत आणि ग्रा. प. वराडा सरपंच सुनिल जामदार यांचे हस्ते महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस पाटील संजय नेवारे, जेष्ट नागरिक नारायण टाले, माजी विद्यार्थी क्रीश ठाकरे, सौरभ ब्रम्हाणकर, पुर्वेश पारधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका के बी निंबाळकर यांनी प्रास्ताविकातुन प्रजासत्ताक दिनाचे महत्व आणि शाळेत वर्षभर राबविण्यात येणा-या उपक्रमा विषयी सांगितले. तदंतर विद्यार्थ्यानी संगीत गीतावर डमलेस व कवायत सादर केली. कार्यक्रमाचे संचालन राकेश गणविर यानी तर आभार सतिश कुथे  यानी मानले. यशस्विते करिता राजेंद्र गभणे सर, अर्चना शिंगणे, कु पायल कोटरूंघे, मोतीराम रहाटे, दिपक पांडे सह विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे जेष्ठ महिला च्या हस्ते ध्वध्वजारोहन

दरवर्षी प्रमाणे ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे विवेका नंद नगर कन्हान येथे माजी खासदार प्रकाश जाधव यांचे अध्यक्षेत आणि जेष्ट महिला विमल साकोरे यांचे हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगिताने सलामी देऊन महापुरूषाना अभिवादन करण्यात आले. यावेळी पी पी पोतदार, एकनाथ खर्चे, माजी सैनिक रविंद रंग, जयवंत गडपायले, प्रविण सतदेवे, ईसराईल शेख, मुकेश घोटेकर, जेष्ट नागरिक मधुकर नागपुरे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी रविंद्र रंग, राखी परते, पोतदार आदीनी स्वातंत्र दिवसाच्या महत्वा विषयी समयोचित मार्गदर्शन केले. तसेच नवनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे याना मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रविंद्र चकोले यानी तर आभार लता वंजारी हयानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, सचिन साळवी, गणेश खांडे कर, विजय डोणेकर, अशोक पोटभरे, गोविंद जुनघरे, प्रदीप वानखेडे, किशोरी अरोरा, ताराचंद निंबाळकर, बाला नायर, विठ्ठल मानकर, नामदेव नवघरे, शालीक राम ठाकरे, कोठीराम चकोले, नेवालाल पात्रे, ज्ञानेश्वर दारोडे, अशोक हिंगणकर, रूपेश सातपुते, नथुजी चरडे, प्रशात येलकर, प्रतिक जाधव, प्रविण गोडे, जीवन ठवकर, मनोज गुडधे, गौरव भोयर, अशोक मेश्राम, निशांत जाधव, यशवंत खंगारे, दामोधर बोकडे, संजय वानखेडे आदीनी सहकार्य केले.

 महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, कन्हान

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र. एक अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषभ बावनकर, प्रमुख पाहुणे आशिष बागडे, जगन कारेमोरे, शंकर कारेमोरे, कैलास राऊत, सामजसेविका वनिता कावळे, रंजना भोयर आदि मान्यवरांचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ऋषभ बावनकर यांचे हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्र ध्वज तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. मान्यवरांनी प्रजासत्ताक दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. मुलांना मिठाई वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रंजना पौनिकर हयांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रेमा कावळे, संध्या सहारे, वैशाली इंगुळकर यांनी परिश्रम घेतले.

आदर्श हायस्कूल, कन्हान

आयडियल एज्युकेशन सोसायटी कन्हान संचालित आदर्श हायस्कूल कन्हान व आयडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळेत संस्था सचिव भरत साळवे यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख पाहुणे कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष रिकेंश चवरे, नगरसेवक शक्ती पात्रे यांचा प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करुन ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देश भक्तीवर गीतांच्या माध्यमातुन रंगारंग कार्यक्रम सादर केले. संस्थेचे सचिव भारत साळवे यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुलांनी स्वातंत्र्य लढा आणि भारतीय राज्यघटनेबद्दल आपले विचार व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षक सोळंकी आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लता पेटकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. भरत साळवे यांनी सर्व विद्या र्थ्यांना देशभक्तीची भावना बाळगण्याचे आवाहन केले . संस्थेचे सहसचिव नीता मेश्राम, सदस्या छाया मिसार , सदस्य घवघवेजी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले. राष्ट्रगीत गाऊ न व मुलांना मिठाई वाटुन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श हायस्कुल कन्हान चे मुख्याध्यापक गिरजाशंकर यादव यांनी केले. संचालन मनोज डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन चापले सर यांनी केले. यशस्वितेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां नी परिश्रम घेतले.

धर्मराज शैक्षणिक परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त धर्मराज शैक्षणिक परिसरात इंदिरा एज्युकेशन सोसा यटी पिवळी नदी नागपुर सचिव खुशालराव पाहुणे यांचे अध्यक्षतेत आणि कांद्री नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक हारगुडे, उपाध्यक्ष धर्मेंद्र सरोदे, नगरसेविका योगीता भलावी, सुनंदा दिवटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विधिलाल डहारे, महादेव किरपान, सुनिल लाडेकर, गोविंदराव किरपान, हरिष केवटे, कु कल्याणी सरोदे, मुख्याध्यापक (माध्य) प्रकाश डुकरे, मुख्याध्यापक (प्राथ) खिमेश बढिये, उपमुख्याध्यापक मोहन भेलक र, पर्यवेक्षक राजुसिंग राठोड आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन पो. उपनिरीक्षक हारगुडे यांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. धर्मराज प्राथमिक शाळेत वर्षभर राबविण्या-या उपक्रमांतर्गत “अभिनंदन विद्यार्थी… I am a shining star” या उपक्रमाच्या यश स्वितेसाठी भिमराव शिंदेमेश्राम यांना तर “आजची उपस्थिती १०० टक्के… अभिनंदन वर्ग” या उपक्रमा च्या यशस्वितेसाठी गणेश खोब्रागडे यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळा स्तरावरील विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोहन भेलकर यांनी तर उपस्थितांचे आभार विलास डाखोळे यांनी मानले.

राष्ट्रीय मांग गारोडी क्रांतीसेना व एम.जी.एस संविधानिक हक्क संघटन

सत्रापुर परिसरात राष्ट्रीय मांग गारोडी क्रांतीसेना व एम.जी.एस संविधानिक हक्क संघटन यांच्या संयु क्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त माजी सैनिक जयवंत गटपाडे, प्रमुख पाहुणे नगरसेवक समशेर पुरवले, नगरसेविका निजी तेलोटे, गणेश भालेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. माजी सैनिक जयवंत गटपाडे यांचा हस्ते ध्वजा रोहण करुन तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. मान्यवरांनी प्रजासत्ताक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार राष्ट्रीय मांग गारोडी क्रांतीसेना सचिव अर्जुन पात्रे यांनी केले. याप्रसंगी जेष्ठ नागरिक भरत सावळे, रामेश्वर शेंडे, राजन भिसे, देविदास खडसे, दलजित पात्रे, देवानंद पेटारे, अनिल लोंढे, प्रीतम शेंडे, महेश लोंढे, जैन इंचुरकर, दिपचंद शेंडे, ऋषभ बावनकर, अरविंद लोंढे, डबलु खडसे, शशिकांत दारुडे, रामुजी खडसे, अजय लोंढे, नरेश हातगाडे, राजेश भोपुलकर, अभय पेटारे, सावन लोंढे, मंगेश पात्रे, उषा पात्रे, अनिता लोंढे, शिला पात्रे, सुदेश शेंडे, भाटिया पात्रे, राजेश उफडे, शंकर शेंडे, मुरली पात्रे, राज भिसे, नितीन भिसे, अनुज खडसे, संदिप शेंडे, सावन पात्रे, नितेश पात्रे, योगेश लोंढे, अरुण पात्रे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 केडीके काॅन्व्हेंट शाळा टेकाडी

टेकाडी येथील केडीके काॅन्व्हेंट शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे, प्रमुख पाहुणे मनिषा येवले , शाळेचे संचालक अविनाश कांबळे, पोलीस पाटील पुंडलिक कुरडकर, सुरेशराव मोहाडे, भोजराज उमक, वसंतराव कांबळे, प्रमोद मलेवार, किशोर वासाडे यांचे हस्ते भारत माता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व. केशवराव देवाजी कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात केली. मान्यवरांचा हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रगिताने राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी देऊन महापुरू षाना अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थांना, पालकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापिका निशा देशमुख, शिक्षिका मनिषा कांबळे, अर्चना कारेमोरे, अर्पना गजभिये, रीना राम, सदानन वासाडे, अंकुश कांबळे, विशाधर कांबळे, रंगराव लेकुरवाडे आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर कॉग्रेस कमेटी कन्हान

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गांधी चौक कन्हान येथे नगर कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे मोठ्या उत्साहाने ध्वजारोहण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व देशसेवेच्या विचारांना अभिवादन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना* देण्यात आली.

या प्रसंगी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय—जपण्याचा आणि त्यावर चालण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी केला.

हा कार्यक्रम  दयाराम भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून कन्हान शहर नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  विनय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री प्रकाश बोंद्रे, नगर परिषद माजी उपाध्यक्ष योगेंद्र (बाबू) रंगारी, मनीष भिवगडे, नगरसेविका व गटनेता रेखा टोहने, नगरसेवक शमशेर पुरवले, कमलेश मेश्राम, दिनेश ढोके, उमेश यादव, धर्मपाल बागडे, गौतम नितनवरे, गौरव माहौरे, रोहित बर्वे, चंद्रशेखर बोरकर, प्रदीप बावने, प्रशांत मसार, पुष्पा भिलावे, दर्शना तिडके, महेश डोंगडे, शैलेश माटे, प्रवीण गोडे, अर्जुन पात्रे, जस्मिन लौंडे, आनंद चकोले, कुणाल खडसे तसेच इतर अनेक मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.