यवतमाळ :- अत्याचारग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी सहाय्यक व्यक्तींची गरज असून, इच्छूकांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे. पॉक्सो कायदा, २०१२ अंतर्गत बालकांना भावनिक आणि मानसिक आधार प्रदान करण्यासाठी सहाय्यक व्यक्तींची नियुक्ती केली जाईल.
समाजकार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र, बाल विकास या विषयात पदव्युत्तर पदवी, बाल हक्क किंवा बाल संरक्षणाच्या क्षेत्रात ३ वर्षाचा अनुभव तसेच बालगृह किंवा निवारागृहाशी संबंधित अधिकारी देखील सहाय्यक व्यक्ती म्हणून अर्ज करण्यास पात्र असु शकतात.
अर्ज जिल्हा बाल संरक्षण कक्ष, २ रा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे स्विकारल्या जातील. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अर्ज करण्याची शेवटचीअर्जाची शेवटची तारीख ३१ जानेवारी 2026 राहील. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी कळविले आहे.








