spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इंदुताई मेमोरियल हायस्कूल व लॉर्ड लेडी कॉन्व्हेंट मध्ये 79 वा. स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात

नागपूर :- 15 ऑगस्ट 2026 रोजी इंदुताई मेमोरियल हायस्कूल व लॉर्ड लेडी कॉन्व्हेंट मध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साह पूर्ण शिस्तबद्ध व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व राष्ट्राप्रती कर्तव्य भावनांचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात द यंग रेव्होल्युशन पँथर शिक्षण संस्था चे सचिव डॉ. सच्चिदानंद फुलेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून देशाची एकता व अखंडता जपणे संविधानाचा आदर करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडणे तसेच विद्यार्थ्यांनो शिक्षणाची कास धरा असा संदेश दिला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष  विद्या फुलेकर ह्या अध्यक्ष म्हणून लाभल्या तर बळवंत डोंगरे, दिनेश ठाकूर, वर्षा श्यामकुळे तसेच प्रभाग क्रमांक २ चे नगरसेविका डोंगरे व लोणारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन रेणू शंभरकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनीलकुमार रीनाईत यांनी मानले व वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular Articles