spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विनापरवाना दारू निर्मिती, विक्री, वाहतूक व सेवनप्रकरणी ८ गुन्हे नोंद

नागपुर :- नागपुर ग्रामीण जिल्हयात दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू काढणारे, दारू बाळगुन विकी, वाहतुक आणि सेवन करणान्यांवर छापा टाकुन मोहाफुल दारू, देशी दारू तसेच वाहन असा एकुण ४२,११५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन कुही येथे आरोपी नामे प्रेमदास मारूजी कामठे, वय ६८ वर्ष, रा. बगटोली ता. कुही याचे वर १ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन बोरी येथे आरोपी क्र. १) राहुल श्रावण नगराळे, वय ५४ वर्ष, रा. चिंतामधी शाळेजवळ टाटा इंडिकॉन टावर मागे सातोडा आलोडी वर्धा ता. जि. वर्धा आणि २) अरविंद देवराव मडावी, वय ३७ वर्ष, रा. रूईखैरी ता. जि. नागपूर यांचे वर प्रत्येकी १ गुन्हा असे २ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे गोपाल रामचंद्र राऊत, वय ३५ वर्ष, रा. येणीकोणी ता. नरखेड याचेवर १ गुन्हा, पोलीस स्टेशन देवलापार येथे आरोपी क्र. १) रज्जन दुरनसिंग मरस्कोल्हे, वय ४५ वर्ष, रा. बोथीया पालोरा, ता. रामटेक जि. नागपूर २) महिला आरोपी यांचे वर प्रत्येकी एक गुन्हा असे २ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन अरोली येथे आरोपी क्र. १) रामकृष्ण माधोजी निमकर, वय ४९ वर्ष, रा. सिरसोली ता. मौदा २) महिला आरोपी यांचे वर प्रत्येकी एक गुन्हा असे २ गुन्हे नोंद, अशा आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ०८ गुन्हे दाखल केले आहे.

नमुद कारवाईत एकुण १) २० लिटर मोहाफुल गावठी दारू २) ११७०० मिली देशी दारू तसेच वाहन असा एकुण ४२,११५/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.