कामठी:-वडोदा ग्रामपंचायत व्दारा श्री चक्रधर स्वामी सेवा भावी ट्रस्ट वडोदा, तर्फे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 804 वा अवतार दिन उत्सव साजरा करण्यात आला. थोर तत्वज्ञ व समाज सूधारक , महानुभाव पंथाचे संस्थापक,लिळाचरिण या मराठीतील पहिल्या चारिसगंधाचे नायक परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ भगवान चक्रधर स्वामी अवतारदिन निमित्तय स्वामी यांच्या ग्रामपंचायत वडोदा येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू थोटे, दिनकर इंगळे ( सचिव ), दत्तू हलमारे, पू ,हं,शूभमराज दादा, टर्सट चे अध्यक्ष विशाल गाडबैल, राजेश निषाणे , (ग्रामपंचायत सदस्य)पंकज ढोरे(ग्रामपंचायत सदस्य), अर्चना गाडबैल (ग्रामपंचायत सदस्य), संजय पिंपळे, रविंद्र हिवसे, राजेंद्र करडभाजने, योगिता अटारकर, भास्कर पानतावणे, सुप्रिया ठाकरे, नम्रता राऊत, दिलिप मस्के, चक्रधर कोंगे, वैशाली अटारकर , रेखा वानखेड़े, रमेश कडव , गणेश जगताप व सर्व महानुभाव पंथीय उपस्थित होते.



