spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रियांती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड

कामठी, २८ : १९ व २० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या नागपूर जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत, प्रियांती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तरोडी (बु.) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्यांची आगामी विभागीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१७ वर्षांखालील मुले:

१. तन्मय बर्डे – ५६ किलो

१९ वर्षांखालील मुले:

१. आतिश चौधरी – ५२ किलो

२. लोकेश गावंडे – ५६ किलो

३. सारंग ठाकरे – ६० किलो

४. रोहित बोकडे – ८० किलो

५. राहुल पटेल – ९० किलो

या सर्व खेळाडूंचे प्राचार्य नंदा ठाकरे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्या प्रिया राऊत, क्रीडा शिक्षक सौरभ बोरकर, आणि सिद्धांत दानी उपस्थित होते.

Popular Articles