– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता. 29) शोध पथकाने 82 प्रकरणांची नोंद करून 32,500 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.100 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 500 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 800 रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 15,000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/ जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 37 प्रकरणांची नोंद करून 7,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अमेय अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. घी भरारी यांनी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत गणेश जनबंधु यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. नेहरुनगर झोन अंतर्गत मे. आनंद फरसान यांनी हॉटेलचा कचरा रस्त्यालगत पसरविल्यामुळे रू. 5,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. ज्योति किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. गजानन किराणा स्टोअर्स यांनी हॉटेलचा कचरा रस्त्यालगत पसरविल्यामुळे रू. 5,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000 दंड वसुल केला.




