spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या अटी जे कोणते पक्ष मंजूर करेल त्याच पक्षाला ३ जानेवारी ला समर्थन देणार – नारायणराव बागडे

– आंरिमो कोणत्या पक्षासोबत जाणार तो निर्णय लवकरच जाहीर करणार – बागडे

नागपूर :- राज्यात होऊ घातलेल्या मनपाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे हात कुठे मजबूत करणार याचा निर्णय आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा नवीन वर्षात येत्या 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जाहीर करणार असे आवाहन यावेळी करण्यात आले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २९ महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारी आहे. या निवडणुकीत पक्षाचे बंधन कार्यकर्त्यांवर लादायचे नाही. जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांना आम्ही मोकळे सोडलेले आहे. त्यांच्यावर निर्बंध घातले तर अन्याय होईल. राज्यातील विविध महानगरपालिका अध्यक्षांच्या अहवाल आंरिमो च्या मुख्यालयात पोहोचला आहे. आमच्यातील काही पक्ष नेते बळ नसतांना स्वबळाचा लपंडाव खेळत आहे. याचा फायदा फक्त नेत्यांच्या फायद्याचे आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच येईल. कार्यकर्त्यांना स्वावलंबी करण्यासाठी कोणासोबत हात मिळवणी करावी हा निर्णय घेण्यासाठी त्यांना स्वतंत्र आंरिमो ने दिलेले आहे. अशी माहिती यावेळी दिली. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या काही अटी आहे त्या अटी पुर्ण करण्या साठी कोणत्याही पक्षांनी मंजूर केल्यास त्यासोबतच आम्ही समर्थन देऊ असे पत्रकारांना सांगितले.

अटी : १) मुंबई चैतन्य भूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला गती द्यावी.

२) वरली स्मशानभूमी येथे माई रमाईचे स्मारक बनावे.

३) दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमीचे नाव द्यावे.

४) पुणे जिल्ह्यातील नाव महात्मा फुले जिल्हा करावा.

५) भीमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे.

६) संभाजीनगर येथे शहीद भीमसैनिक स्मारक व्हावे.

७) नागपूर येथील अंबाझरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे नाव द्यावे.

८) धंतोली येथे डॉ. जन्म शताब्दी स्मारक व्हावे.

९) नारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क या मागणीला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला समर्थन देण्याच्या विचार करण्यात आला आहे. असे बागडे यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने पत्रपरिषदेमध्ये उपस्थित अध्यक्ष नारायणराव बागडे, देवेंद्र बागडे, प्रकाश कांबळे, राजू दादा पांजरे, धर्माजी बागडे, प्रा.रमेश दुपारे, सुरेश ढोणे, प्रवीण आवळे, हंसराज उरकुटे, राजू कांबळे, चरणदास गायकवाड आणि पुण्यशील बोधिले यांची उपस्थिती होती.

Popular Articles