spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या आंदोलनाला मोठे यश

– घाटरोहणा च्या १६ स्थानिक बेरोजगारांना नोकरीचे लेखी आश्वासन

कन्हान :- महाजेनको प्रशासनाकडुन स्थानिक बेरोज गारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात खासदार श्याम कुमार बर्वे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अवघ्या दोन तासांत मोठे यश आले आहे. गोंडगाव खदान ते खापरखेडा पाईप कन्व्हेयर प्रकल्पात घाटरोहणा येथील १६ स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचे लेखी आश्वासन महाजेनको प्रशासनाने दिले असुन, ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासही सहमती दर्शवली आहे.

गोंडगाव खदान ते महानिर्मिती खापरखेडा येथे पाईप कन्व्हेयरच्या माध्यमातुन कोळसा वाहतुक केली जाते. या प्रकल्पात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी घाटरोहणाचे सरपंच किशोर बेहुने यांनी लावुन धरली होती. मात्र, प्रशासना ने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाने सरपंच व काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. या कारवाईमुळे परिसरात संतापाची लाट उसळल्याने स्थानिकांवर होत असलेला अन्याय पाहुन खासदार श्यामकुमार बर्वे यांनी स्वतः मैदानात उतरून सोमवार (दि.२९) डिसेंबर ला घाटरोहणा येथे त्यांचे नेतृत्वात जोरदार आंदोलन छेडण्यात आले.

“जो पर्यंत स्थानिकांना रोजगार मिळत नाही आणि ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तो पर्यंत माघार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका खासदार बर्वे यांनी घेतल्याने महाजेनको प्रशासनाचे धाबे दणाणले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलकांशी चर्चा करून अव घ्या काही तासात खासदारांच्या सर्व मागण्या मान्य करित प्रशासनाने १६ तरुणांना एप्रिल २०२६ पर्यंत नोकरी देण्याचे लेखी पत्र दिले असुन पोलिसांमार्फत ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्या चे आश्वासन दिले आहे. या यशाबद्दल घाटरोहणा ग्रा पं आणि स्थानिक नागरिकांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांचे आभार मानले आहेत. अन्याया विरुद्ध लढणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या खंबीर पाठींब्यामुळेच स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

या आंदोलनात खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी शिक्षण सभापति राजू कुसुंबे, माजी जि प सदस्य अर्चना भोयर, दिनेश ढोले, देवेंद्र गोडबोले, प्रकाश खापरे, माजी सभापति मंगला निंबोने, नरेश बर्वे, दयाराम भोयर, दीपक भोयर, प्रफुल कावळे, अशोक चिखले, सीताराम भारव्दाज, चेतन देशमुख, घाटरोहणा सरपंच किशोर बेहुने, उपसरपंच अशोक पाटील, माजी सरपंच दिगांबर ठाकरे, तेजराम सरिले बखारी सरपंच नरेश ढोणे, बिना सरपंच हरिश गजभिये, वराडा माजी सरपंच विद्या चिखले, कांद्री माजी सरपंच बलवंत पडोळे, घाट रोहणा ग्रा प सदस्य सुरज पाटील, राजकुमार बावणे, ग्रा.पं. सदस्या शेशिकला सोनवाणे, सुनिता तांडेकर, रीना पाटील, टेकाडी ग्रा.पं. सदस्य सतिश घारड, नांद गाव ग्रा.पं. सदस्य- सेवक ठाकरे, रामभाऊ ठाकरे, अशोक दलाल, घनश्याम टिकमकर, महेश झोडावने, श्याम वाटकर, मोतीलाल बेहुणे, उत्तम सूर्यवंशी, संजय छानिकर, सुनिल पाटील, अमित छानिकर, हिरामण सोनवाणे, सिद्धार्थ पाटील, छन्नू पाहाडे, नत्थु शिंदेकर, लालचंद बावणे, सौरभ काळे, शुभम कावळे, सुरज काळे, आशा लोखंडे, नर्मदा शिंदेकर, सुनंदा निस्ताने, शकुन नेवारे, सविता सूर्यवंशी, इंदिरा बेहुणे, ज्योति भाटोळे सह मोठया संख्येने ग्रामस्थ मुलबाळासह उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.