spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दररोज नव्याने संकलित कचऱ्यावर होणार पूर्ण क्षमतेने प्रक्रिया

– भूमी ग्रीन प्रकल्पाच्या ‘ड्रायरन’ ला सुरूवात

– परिसरात कचऱ्याचे ढिगारे तयार होणार नसल्याची दक्षता घेण्याचे आयुक्तांचे निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीद्वारे नवीन घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर सोमवारीपासून (ता.२९) ड्रायरन ला सुरुवात करण्यात आली. येत्या २० जानेवारीपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर दररोज संकलित होणाऱ्या ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून, सध्या सुसबिडीच्या मध्यामातून ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. आता नवीन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केल्यामुळे या नव्याने कचऱ्याचे ढिगारा निर्माण होणार नाही, आणि जुन्या कचऱ्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता आहे.

ड्रायरनच्या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, सल्लागार राजेंद्र जगताप, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीचे विजय टिळेकर,  पंकज पासनकर, श्रीकृष्ण दीक्षित, कमलेश सिंह,  संकेत जाधव, मनपाचे स्वच्छता अधिकारी रोहिदास राठोड यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रमुख्याने उपस्थित होते.

यावेळी आयुक्त यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करीत प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती जाणून घेतली. प्रकल्पात प्रवेश करण्यापूर्वी वाहनांची वजन केल्या जाणाऱ्या ठिकाणी आयुक्त यांनी वाहने ये जा सुखर व्हावे, याठिकाणी वाहनांच्या रांगा लागू नये, संपूर्ण परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात यावा, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच या घनकचरा प्रक्रिया केंद्राचे बहुतांश कार्य पूर्ण झाले असून, उर्वरित कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या निर्देश दिले. याशिवाय डम्पिंग यार्ड परिसरात केंद्र लगत असणाऱ्या नाल्यांची सफाई करून घेण्यात यावी. ड्रायरन करिता लागणारा कचरा केंद्राला पुरविण्यात यावा अशा देखील सूचना आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या माध्यमातून भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील एकीकृत घनकचरा प्रकल्पाच्या दहा एकर जागेवर उभारण्यात आलेल्या प्रक्रिया केंद्राद्वारे परिसरातील पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या घनकचरा प्रक्रिया केंद्राचे बहुतांश कार्य पूर्ण झाले असून, प्रक्रिया केंद्र लवकरच पूर्ण क्षमतेने कार्य सुरू होणार आहे. याद्वारे प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीला येत्या पाच वर्षांत करारबद्ध करण्यात आले आहे.

चार महिन्यात प्रकल्प उभा

पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर अवघ्या चार महिन्यात संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आला आहे. याकरिता परिसरातील कचऱ्याचे ढिगारे कमी करून त्या जागेवर उभारण्यात आला आहे. प्रकल्प उभारणीसाठी मनपाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कार्य केल्याबद्दल आयुक्तांनी अधिकाऱ्यांचे कौतुक करीत उर्वरित कार्य त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.