– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार(ता.8) रोजी शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 69,700 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 7,600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रू.1,200 चे दंड वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 8,500 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, मोकळी जागा, फुटपाथ इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रू.8,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 37 प्रकरणांची नोंद करून 7,400 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून रु. 12,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विवाह सभागृह इत्यादी ठिकाणी 1 प्रकरणाची नोंद करून रू.25,000 दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. विराज इंफ्राटेक यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे.गुरूकृपा कंस्ट्रक्शन श्रीनिवास यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. अर्चना स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु.5,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. आकाश प्लास्टीक शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु.5,000 चे दंड वसूल करण्यात आले.लकडगंज झोन अंतर्गत मे. स्काय वन रेसीडेंसी यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत टाकल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. फ्युजन बाय द स्ट्रीट यांनी ड्रेनेज लाईनमध्ये उरलेले अन्न टाकल्यामुळे रू.25,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.60,000 दंड वसूल केला.




