spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षण पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

यवतमाळ :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेकशन बोर्ड,एस एस बी या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे इच्छुक असलेल्या नवयुवक आणि नवयुवतींसाठी एक सुवर्णसंधी दिनांक 3 नोव्हेंबर ते १2 नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस एस बी कोर्स क्रमांक ६3 आयोजित करण्यात आला आहे.कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास,भोजन,प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

जिल्हयातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे दि. 30 ऑक्टोबर २०२५ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी उमेदवाराने डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेरे पुणे DSW या www.mahasainik.maharashtra.gov.in वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एस एस बी ६3 कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे. किंवा व्हाट्सॲप क्र. 9156073306 या मोबाईल नंबर वर एस एस एस बी ६3 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाईल शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कार्सला येताना सोबत घेवून येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन सीडीएसए-युपीएससी अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन युपीएससी पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वाटरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस एस बी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी :training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.