spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध दारू विक्री व सेवनप्रकरणी ९ गुन्हे दाखल

नागपूर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मीती, विक्री तसेच दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०९ गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशननिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पोलीस स्टेशन बोरी येथे आरोपी नामे १) जितेंद्र हरीचंद कोरचे, वय ३५ वर्ष, रा. जयपुर सातगाव, ता. हिंगणा, जि. नागपुर २) धनीराम किसन खांडेकर, वय ६० वर्ष, रा. समाज भवन इंदिरा माता नगर, डॉ आंबेडकर मार्ग नागपुर, ह. मु. दुधा शिवार ता. हिंगणा, जि. नागपुर ३) राहुल जयपाल भट, वय २४ वर्ष, रा. रूईखखैरी, ता. जि. नागपुर ४) महिला आरोपी यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०४ गुन्हे नोंद. पोलीस स्टेशन उमरेड येथे आरोपी नामे १. निलेश गुलबा वाघ, वय ३२ वर्ष, रा. ठाणा उमरेड २. अमोल मुकुदा गायगवळी, वय ३५ वर्ष, रा. मांगली उमरेड यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०२ गुन्हे नोंद. पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आरोपी नामे रविंद्र शंकरराव कांबळे, वय ४० वर्ष, रा. पिंपळगाव राउत ता. नरखेड याचेवर ०१ गुन्हा नोंद. पोलीस स्टेशन कोंढाळी येथे आरोपी नामे शैलेंन्द्र फत्तुजी हुलके, वय २९ वर्ष, रा. आडेगाव, ता. हिंगणा याचेवर ०१ गुन्हा नोंद. पोलीस स्टेशन देवलापार येथे आरोपी नामे धर्मराज उर्फ धर्मु विदेशी वरठी, वय ५८ वर्ष, रा. खिडकी, ता. रामटेक, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद.

Popular Articles