spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळताना आरोपींवर गुन्हा

अरोली :- अरोली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा कोदामेंढी येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे अरोली पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १. उपदेश बळीराम लेंढे, २. विनोद रामाजी गुरनुले ३. सुरेश श्रावण गुरनुले ४. जिबल चिंधु मांदाडे, सर्व रा. कांदामेंढी, ता. मौदा, जि. नागपुर यांना ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना जागीच पकडले, पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तासपत्ते आणि रोख रक्कम १०१०/- रूपये असा एकुण १११०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद ०४ आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन अरोली येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles