spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिबीरात ९१६ लाभार्थ्यांचे झाले समाधान

सचिन चौरसिया, रामटेक :- महसूल विभागाचे सर्व विभाग एकाच छताखाली आणून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेले, राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा रामटेक शहरात (दि.८) मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ०५ शांती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध दाखले व शासकीय सेवांचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन करताना राज्यमंत्री ऍड. आशीष जयस्वाल हे प्रामुख्याने उपस्थित राहुन शासनाच्या विविध योजेनेबाबत माहिती देवून मार्गदर्शन केले. शिबीरात प्रियेश महाजन, उपविभागीय अधिकारी, रमेश कोळपे, तहसिलदार, रामटेक यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. सदर शिवीरामध्ये प्रामुख्याने बिकेंद्र महाजन, नगराध्यक्ष, आलोक मानकर, उपाध्यक्ष, सुमित कोठारी, सुरेखा माकडे, विश्वास पाटील सभापती, रजत गजभिये व इतर नगरसेवक उपस्थित होते. शिबिरामध्ये रामटेक मंडळातील रामटेक नगरपरिषद क्षेत्रातील व ग्रामपंचायत पटगोवारी, मनसर, खैरी विजेवाडा, मानापूर, शितलवाडी, हिवराहिवरी अंतर्गत गावातील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवून शिबीराचा ९१६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. महसुल विभागाअंतर्गत ७/१२ वाटप, फेरफार नोंदणी, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, निवडणूक विभाग व इ. २५७, आपले सेवा सरकार केंद्र मार्फत ९६ दाखले, आधार नोंदणी ५७, सं.गा.यो. ६६, पुरवठा विभाग २७, लार्भार्थ्यांना लाभ देण्यात आला. उपअधिक्षक, भुमि अभिलेख विभागामार्फत २, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था १८, आगार व्यवस्थापक यांचे तर्फे ११२ महिलांना प्रवासात ५० टक्के सुट सवलत दाखले, आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी १०७ लाभ, पंचायत समिती मार्फत ६४, तसेच महिला बाल विकास विभागामार्फत बेबी केयर किट वाटप ०८, कृषी विभाग विविध योजनेचे ४०, पशुसंवर्धन ३५, पेंच पाटबंधारे व लघु पाटबंधारे विभागामार्फत १९, वनपरिक्षेत्र अधिकारी, रामटेक ८ लाभार्थ्यांना लाभदेण्यात आले.

सदर शिबीरात पल्लवी राऊत, मुख्याधिकारी, बोबडे उपअधिक्षक, भुमि अभिलेख, व भोजराज बडवाईक, नायब तहसिलदार, अमित निंबाळकर, संदेश हलमारे निरीक्षण अधिकारी, मारोती भुजाडे, सहा, गटविकास अधिकारी, अमितदीप दवने, महिला व बालविकास अधिकारी, व प्रेरणा भगत, मंडळ अधिकारी नगरधन, जयश्री तिजारे मंडळ अधिकारी, रामटेक मंडळातील सर्व ग्राम महसुल अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. काकडे व वैद्यकीय चमु, बस आगर व्यवस्थापक सेतु, आधार, महिला बचत गट महसुल विभागातील व नगरपरिषद विभागातील व ईतर विभागातील अधिकारी व कर्मचारी या शिबिराकरितां उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.